Assam Rifles Bharti 2026 : असम रायफल्स अंतर्गत तांत्रिक आणि ट्रेड्समन या पदांसाठी मोठी भरती जाहिरात करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध तांत्रिक ट्रेड मध्ये एकूण 354 रिक्त पदे भरले जाणार आहेत. या 354 रिक्त पदांमध्ये वॉरंट ऑफिसर, रायफलमॅन, हवालदार अशा विविध पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही 28 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 ऑक्टोबर 2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. या भरतीची रॅली ची सुरुवात ही तात्पुरती 23 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.
या भरतीमध्ये 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा तसेच संबंधित तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या ट्रेड नुसार अर्ज करायचा आहे. सर्व ट्रेड साठी फक्त पुरुष उमेदवार पात्र आहेत.
पदांची माहिती
या भरतीमध्ये एकूण 354 रिक्त पदे जाहीर करण्यात आले आहेत आणि हे 354 रिक्त पदे एकूण 18 ट्रेड साठी आहेत. ट्रेड नुसार पदांची संख्या खालील प्रमाणे दिले आहे.
| पदांची नावे | पदांची संख्या |
| वॉरंट ऑफिसर (सायफर) | 124 |
| रायफलमॅन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) | 32 |
| रायफलमॅन (लाईनमॅन फील्ड) | 21 |
| रायफलमॅन (शस्त्रास्त्र कारागीर) | 29 |
| रायफलमॅन (इंजिनीयर मेकॅनिक) | 10 |
| रायफलमॅन (रिकव्हरी वेहिकल मेकॅनिक) | 13 |
| रायफलमॅन (इलेक्ट्रिशियन मोटर वेहिकल) | 22 |
| हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 06 |
| रायफलमॅन (लोहार) | 19 |
| रायफलमॅन (अपहोलस्टर) | 03 |
| रायफलमॅन स्टोर कीपर टेक्निकल | 16 |
| रायफलमॅन (वेहिकल मेकॅनिक) | 23 |
| रायफलमॅन (वेल्डर) | 02 |
| वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) | 02 |
| वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थेटर टेक्निशियन) | 01 |
| वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) | 02 |
| रायफलमॅन (गवंडी) | 29 |
हे एकूण 354 रिक्त पदे आहेत. यामध्ये काही पदे माजी सैनिक यांच्यासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आले आहेत. रिक्त पदांची संख्या तात्पुरती असून विभागाच्या निर्णयानुसार त्यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.
शैक्षणिक पात्रता
असम रायफल्स अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या निवडलेल्या ट्रेड नुसार वेगवेगळी असणार आहे. खालील प्रमाणे पदा नुसार शैक्षणिक पात्रता दिली आहे.
| पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
| वॉरंट ऑफिसर (सायफर) | या पदासाठी 12वी मध्ये फिजिक्स, गणित आणि इंग्रजी हे विषय असणे तसेच संबंधित कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये NSQF लेवल 4 किंवा त्याच्यापेक्षा उच्च स्तरावरील किमान दोन वर्षाचे कोर्स असणे आवश्यक आहे. या विषयांमध्ये पदवीधारक उमेदवारांनाही पात्रता लागू आहे |
| रायफलमॅन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल), रायफलमॅन (लाईनमॅन फील्ड), रायफलमॅन (इलेक्ट्रिशियन मोटर वेहिकल), हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक), रायफलमॅन (लोहार), रायफलमॅन (वेहिकल मेकॅनिक) | या तांत्रिक पदांसाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय किंवा दोन/तीन वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे |
| रायफलमॅन (रिकव्हरी वेहिकल मेकॅनिक) | या पदासाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि जड वाहन परवाना असणे आवश्यक |
| रायफलमॅन स्टोर कीपर टेक्निकल | उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक |
| वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) | उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक व त्यासोबतच आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा असले पाहिजे |
| वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थेटर टेक्निशियन), वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) | या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि संबंधित किमान दोन वर्षाचा डिप्लोमा आणि मान्यताप्राप्त 50 खाटांच्या रुग्णालयामध्ये किमान एक वर्षाचे अनुभव असणे आवश्यक |
| रायफलमॅन (गवंडी) | या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि संबंधित ट्रेडमध्ये पात्र असले पाहिजे आणि त्यासोबतच एक वर्षाचे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे |
वयोमर्यादा
रायफलमॅन आणि हवालदार या पदासाठी वयोमर्यादा हे 18 वर्ष ते 23 वर्ष असे आहे. तसेच वॉरंट ऑफिसर (सायफर), वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थेटर टेक्निशियन), वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) या पदासाठी वयोमर्यादा 18 वर्ष ते 25 वर्ष कसे आहे.
वयाची गणना करण्यासाठी 01 जुलै 2026 ही कट ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत देणार आहेत. एससी/एसटी या उमेदवारांना 05 वर्ष तर ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षाची सवलत आहे. माजी सैनिकांसाठी लागू नियमानुसार अतिरिक्त वयोमर्यादा सवलत दिली जाणार आहे.
शारीरिक चाचणी
असम रायफल्स मध्ये भरती होण्यासाठी शारीरिक पात्रता ही खूप महत्त्वाची आहे. उमेदवाराची फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार आहे.
सामान्य क्षेत्रातील पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेमी आणि छाती 80 सेमी ते 85 सेमी अशी आवश्यकता आहे. काही विशिष्ट प्रदेश आणि प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार उंची आणि छातीमध्ये सवलत मिळू शकते.
एसटी उमेदवारांसाठी ही निर्धारित शारीरिक माणसांमध्ये सवलत लागू आहे. संबंधित सवलत घेण्यासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मध्ये पुरुषांनी 05 किलोमीटर 24 मिनिटात पूर्ण करायचे आहे. लडाख प्रदेशातील उमेदवारांसाठी 1.6 किलोमीटर 07 मिनिटात पूर्ण करायचे आहे.
निवड प्रक्रिया
असम रायफल्स मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही अनेक टप्प्यात होणार आहे.
- फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट
- फिजिकल एफिशियन्सी टेस्ट
- कागदपत्र पडताळणी
- कम्प्युटर बेस टेस्ट
- ट्रेड स्किल टेस्ट
- मेडिकल एक्झामिनेशन
- रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन
- अंतिम गुणवत्ता यादी
सीबीटी परीक्षा १०० गुणांची असणार आहे. सामान्य आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 35 टक्के तर एससी/एसटी/ओबीसी या उमेदवारांसाठी 33 टक्के गुण आवश्यक आहेत.
ट्रेड स्किल टेस्ट ही पात्रता स्वरूपाची चाचणी आहे. या चाचणीसाठी स्वतंत्र गुण दिले जाणार नाहीत. सीबीटीच्या गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या तुलनेत साधारण 1:4 प्रमाणात उमेदवारांना पुढे कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाऊ शकते.
. सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची ट्रेड आणि प्रवर्गनिहायक गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार. फक्त सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्याने अंतिम निवड निश्चित होत नाही. अंतिम निवड गुणवत्ता यादी आणि उपलब्ध रिक्त पदांनुसार केली जाणार.
अर्ज शुल्क
ग्रुप सी या पदासाठी अर्ज शुल्क 100/- रुपये आकारले गेले आहे आणि एससी/एसटी आणि एक्स सर्विसमॅन या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारले गेले नाही आहे.
एकदा भरलेले शुल्क उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. उमेदवारांनी अर्ज शुल्क करण्यापूर्वी संबंधित ट्रेड साठी आपली पात्रता तपासून घ्यायची आहे.
महत्त्वाची तारीख
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 28 ऑक्टोबर 2026 रात्री 11:59 वाजता पर्यंत आहे. अंतिम दिवसाची वाट न पाहता उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांना सहभागी होण्यासाठी प्रवास, राहण्याचा खर्च आणि इतर खर्च स्वतः करायचा आहे. कोणत्याही टप्प्यासाठी TA/DA दिले जाणार नाही. भरती केंद्रावर मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार प्रशिक्षण आणि प्रोबेशन कालावधी लागू होणार. अर्जामध्ये चुकीची माहिती असल्यास उमेदवारांचे कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येऊ शकते.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे आणि आपल्या ट्रेड ची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक निकष आणि इतर अटी तपासून घ्यायची आहेत.
अर्ज कसा करायचा आहे ?
- वरील पदांसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 ऑक्टोबर 2026 रात्री 11:59 वाजता पर्यंत आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहे. इच्छुक उमेदवा आवश्यक माहिती करिता या संकेतस्थळाला भेट द्यावी www.assamrifles.gov.in
- अधिकृत माहिती उमेदवारांनी वाचून घ्यायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |