Cochin Shipyard Mumbai Bharti 2026 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट मध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटिस भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये फिटर, इलेक्ट्रिशन आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या ट्रेडमध्ये एकूण 06 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
प्रशिक्षण दरम्यान उमेदवारांना दर महिन्या 11,000/- वेतन दिले जाणार. प्रशिक्षणाचे कालावधी एक वर्षाचे असून, प्रत्यक्ष कामाचा वातावरणात संबंधित ट्रेड चे कौशल्य आणि अनुभव मिळवण्याची ही चांगली संधी उमेदवारांना मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, महाराष्ट्रातील अधिवास, शारीरिक पात्रता आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणारे उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकता.
पदांची माहिती
या भरतीमध्ये आयटीआय ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण सहा जागा रिक्त आहेत. या पदांसाठी तपशील खालील प्रमाणे दिले आहे.
- फिटर – 02 जागा
- इलेक्ट्रिशन – 02 जागा
- कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – 02 जागा
या वरती मध्ये प्रत्येक ट्रेड साठी दोन जागा असल्यामुळे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे.
शैक्षणिक पात्रता
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई जहाज दुरुस्ती युनिट या भरतीमध्ये अप्रेंटिस या पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे संबंधित ट्रेड चे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) असणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, फिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे फिटर ट्रेड मध्ये ITI/NTC पात्रता असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशन आणि COPA या पदासाठी संबंधित ट्रेड मध्ये ITI पात्रता असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता संबंधित अजून माहिती बघण्याकरिता उमेदवार अधिकृत जाहिरात वाचू शकता आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता संबंधित अटी वाचू शकता.
महाराष्ट्र अधिवासाची अट
या भरतीसाठी उमेदवार भारतीय नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मधील पात्र ITI उत्तीर्ण उमेदवारांनी या भरतीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे.
अधिवासाचा पुरावा किंवा संबंधित कागदपत्र अर्ज सोबत उमेदवारांनी निवड प्रक्रियेत सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपले कागदपत्र आधीच तयार करून ठेवायचे योग्य ठरेल.
वयोमर्यादा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांचे वय हे 19 ऑक्टोबर 2026 रोजी किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
कमाल वयोमर्यादा अप्रेंटीशीप नियमानुसार लागू असणार. तसेच भारत सरकारच्या नियमानुसार पात्र उमेदवारांना वयामध्ये सवलत लागू होऊ शकते.
वयाची अचूक गणना करताना अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेले कट ऑफ तारीख आणि संबंधित नियम विचारात घेण्यात घ्यावेत.
वेतन आणि प्रशिक्षण कालावधी
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाचे कालावधीत दर महिना 11,000/-रुपये वेतन दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाचा एकूण कालावधी एक वर्ष असणार आहे. उमेदवार अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण घेताना संबंधित ट्रेड ची निगडित प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे ITI शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही संधी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकते.
अप्रेंटिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी नोकरी मिळेलच असे उमेदवारांनी गृहीत धरू नये. उमेदवारांनी याबाबत अधिकृत जाहिरातीत अटी व नियम पाहून घ्यायचे आहे व वाचून घ्यायचे आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑफलाइन पद्धतीने लेखी चाचणी द्वारे केली जाणार आहे. निवड प्रक्रिये मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या स्वरूपाची चाचणी असल्याचे जाहिरातीत नव्हत करण्यात आले आहे.
लेखी परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी आपल्या ITI ट्रेड संबंधित मूलभूत विषयांचा अभ्यास करायचा आहे. तसेच 10वी स्तरावरील आवश्यक ज्ञान आणि सामान्य लेखी परीक्षेचे स्वरूपाचे सराव करणे उपयुक्त ठरू शकते याची उमेदवारांनी नोंद ठेवायची आहे.
परीक्षेची तारीख वेळ आणि ठिकाण आणि इतर सूचनांसाठी उमेदवारांनी कोचीन शिपयार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यायचे आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरायचे नाही आहे.
अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील काळजीपूर्वक भरायचे आहेत. चुकीची माहिती भरल्यास किंवा अपूर्ण माहिती असल्यास अर्जावर परिणाम होऊ शकतो.
अर्ज कसा करायचा आहे ?
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई ITI ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया 30 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 ऑक्टोबर 2026 असे आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मुंबई यांच्या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे. भरती विभागामध्ये उपलब्ध असलेली संबंधित अप्रेंटिस जाहिरात वाचायची आहे आणि त्यानंतर पात्रता आणि इतर अटी तपासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांनी आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल, शैक्षणिक माहिती योग्य पद्धतीने भरायचे आहे. आवश्यक कागदपत्र उमेदवारांना मागितल्यास ते निर्धारित पद्धतीने अपलोड करायचे आहे.
अर्ज पूर्ण केल्यानंतर सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्ज यशस्वीपणे सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रत उमेदवारांनी सांभाळून ठेवायचे आहे. भविष्यात ती प्रत उपयोगी ठरू शकते.
आवश्यक कागदपत्रे
अर्थ करताना किंवा पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्र तयार असले पाहिजे. खालील दिलेल्या प्रमाणे उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे.
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका
- संबंधित ट्रेड चे ITI प्रमाणपत्र
- नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC)
- जन्मतारखेचा पुरावा
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
- ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- स्वाक्षरी
- आरक्षण लागू असल्यास सवलतीसाठी संबंधित प्रमाणपत्र
वरती दिलेल्या लिस्टनुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवायचे आहेत.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज | रजिस्ट्रेशन लिंक ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |