ITBP GD Constable Bharti 2026 : भारत-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत क्रीडा कोट्यामधून कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) या पदाची भरती प्रक्रिया प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), गट क अराजपत्रित आणि-मंत्रालयीन-क्रीडा कोटा या पदांच्या एकूण 126 जागा रिक्त आहेत.
क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची ठरणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे आणि इच्छुक उमेदवारांनी 03 ऑक्टोबर 2026 ते 01 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, क्रीडा पात्रता, क्रीडा संबंधित आवश्यक प्रमाणपत्र आणि इतर अटी तपासून घ्यायचे आहे.
पदांची माहिती आणि क्रीडा प्रकार
भारत-तिबेट सीमा पोलीस दल या भरतीमध्ये कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) या पदासाठी विविध क्रीडा प्रकारच्या समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये खालील दिलेल्या प्रमाणे खेळांचा समावेश आहे.
- ॲथलेटिक्स- 200 मीटर, 5000 मीटर, 10000 मीटर, ट्रिपल जंप
- जलतरण व वॉटर पोलो
- आर्चरी
- बॅडमिंटन
- बास्केटबॉल
- बॉक्सिंग
- फुटबॉल
- जिम्नॅस्टिक
- हँडबॉल
- आईस वॉकी
- हॉकी
- खो-खो
- पावर लिफ्टिंग
- स्पोर्ट्स शूटिंग
- टेबल टेनिस
- तायक्वांदो
- वेटलिफ्टिंग
- कुस्ती
- कयाकिंग
- रोइंग
- सायकलिंग
- कराटे
- तायक्वांदो
- व्हॉलीबॉल
- स्कीइंग
- ज्युदो
- अश्वारोहण
- पेनकॅक सिलाट
काही क्रीडा प्रकारांमध्ये विशिष्ट प्रकार किंवा स्पर्धा प्रकारानुसार पात्रता लागू आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित क्रीडा पात्रतेची माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त 10वी उत्तीर्ण असणे या भरतीसाठी पुरेसे नसून उमेदवार हा क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि त्या संबंधित क्रीडा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची क्रीडा पात्रता संबंधित नियमानुसार तपासली जाणार आहे त्यामुळे अर्ज करताना क्रीडा प्रमाणपत्रातील माहिती आणि अर्जातील माहिती अचूकपणे भरायचे आहे. ही भरती क्रीडा कोट्यातून होत असल्यामुळे उमेदवाराकडे संबंधित क्रीडा क्षेत्रामधून आवश्यक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 23 वर्ष असे असले पाहिजे. काही पात्र उमेदवारांनी सरकारी नियमानुसार सवलत मिळू शकते. गुणवंत क्रीडापटूंसाठी कमाल 05 वर्षापर्यंत, तर एससी/एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना कमाल 10 वर्ष पर्यंत सवलत लागू होणार आहे गुणवंत क्रीडापटूंसाठी.
वयाची गणना कोणत्या तारखेनुसार केली जाणार आहे आणि सवलती साठी कोणत्या अटी लागू आहेत हे उमेदवारांनी अधिकृत जाहिराती तपासून घ्यायचे आहे.
वेतन
भारत-तिबेट सीमा पोलीस दल या भरतीमध्ये कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) या पदासाठी नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना 21,000/-रुपये ते 69,100/-रुपये या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार आहे. याशिवाय ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत येते व त्यामुळे केंद्र सरकारचे सर्व नियम लागू होणार आणि भत्ते व इतर सेवांचा लाभ उमेदवारांना मिळणार.
भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे भारताच्या सीमावर्ती भागातील सुरक्षेशी संबंधित महत्वाचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतातील विविध ठिकाणी होऊ शकते त्यामुळे उमेदवारांनी संपूर्ण भारतात सेवा करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क प्रवर्ग आणि उमेदवारांच्या श्रेणीनुसार वेगळे आहे.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या पुरुष उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क आहे.
महिला उमेदवार, माजी सैनिक, एससी/एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे व अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क भरताना उमेदवारांनी अधिकृत ऑनलाइन अर्ज प्रणाली मध्ये उपलब्ध असलेले पेमेंट पर्यायांचा निवड करायचा आहे आणि अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
निवड प्रक्रिया
भारत-तिबेट सीमा पोलीस दल क्रीडा कोटा या भरतीमध्ये उमेदवारांची निवड त्यांच्या क्रीडा कामगिरी सह विविध टप्प्यांच्या आधारे केले जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार निवड प्रक्रियेत खालील प्रमाणे पुढील टप्प्यांचा समावेश आहे.
- क्रीडा प्रमाणपत्रांचा आधारे शॉर्टलिस्टिंग
- शारीरिक मानक चाचणी
- वैद्यकीय तपासणी
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया 03 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12:01 वाजता सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 01 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजता आहे. अंतिम तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवून द्यायचा आहे. अंतिम तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी अर्ज करायचा आहे कारण अंतिम दिवसात वेबसाईटवर लोड येऊ शकतो आणि त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांना अडचण येऊ शकते.
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज संबंधित संपूर्ण माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरात बघून घ्यायची आहे.
सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन संबंधित कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) स्पोर्ट्स कोटा ही जाहिरात शोधायची आहे. त्यानंतर उमेदवारांनी ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वर क्लिक करून उघडायचे आहे.
त्यानंतर आवश्यक वैयक्तिक माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, आणि क्रीडा कामगिरी शी संबंधित माहिती अचूकपणे भरायची आहे. आवश्यक कागदपत्रे आणि क्रीडा प्रमाणपत्र माहिती भरल्यानंतर अर्जातील सर्व तपशील पुन्हा तपासायचे आहे.
लागू असल्यास ऑनलाईन अर्ज शुल्क भरायचे आहे आणि अंतिमरित्या सबमिट करायचे आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रत सोबत ठेवायची आहे भविष्यात उपयोगी ठरू शकते.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत जाहिरात | अधिकृत जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज लिंक | ऑनलाईन अर्ज लिंक |