पुणे येथे मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू!! CSIR-NCL Pune Bharti 2026

CSIR-NCL Pune Bharti 2026 : पुणे येथे CSIR -नॅशनल केमिकल लॅबोरेटरी या विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 24 रिक्त पदे भरले जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची महत्त्वाची संधी आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 05 ऑक्टोबर 2026 सकाळी 10:00 वाजेपासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 04 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करून द्यायचा आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उमेदवारांनी लवकर अर्ज करायचा आहे कारण शेवटच्या दिवशी उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्यामुळे याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे.

CSIR-NCL पुणे ही वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असून येथे विविध वैज्ञानिक आणि प्रशासकीय कामकाज चालते. मल्टी टास्किंग स्टाफ पदावर निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेच्या नियमानुसार काम करावे लागणार आहे.

पदांची माहिती

CSIR-NCL पुणे मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी रिक्त पदे जाहीर करण्यात आले आहे. एकूण जागा 24 आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या नियमानुसारच अर्ज प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

CSIR-NCL पुणे पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार हा किमान मान्यताप्राप्त बोर्ड मधून मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

10वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता संबंधित सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये तपासून घ्यायचे आहे.

अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रातील माहिती योग्य पद्धतीने भरायची आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास उमेदवाराचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादा

CSIR-NCL पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराचे अर्ज हे 04 नोव्हेंबर 2026 रोजी कमाल 24 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.

CSIR या नियमानुसार पात्र प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित सवलत लागू होऊ शकते. वयोमर्यादा सवलतीसाठी पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून घ्यायचे आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपली जन्मतारीख आणि वयाची अट तपासून पाहणे आवश्यक आहे.

वेतन

मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना लेवल एक वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.

वेतनश्रेणी : 18,000/-रुपये ते 56,000/-रुपये

अंदाजे एकूण मोबदला : सुमारे 40,000/-रुपये

वेतन सोबत लागू असलेले इतर भत्ते आणि सेवा सुविधा संस्थेच्या नियमानुसार मिळणार आहे. प्रत्यक्ष वेतन संबंधित माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत अटी तपासून घ्यायचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी काही प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क लागू आहे.

सामान्य प्रवर्ग, ओबीसी प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क लागू आहे. तसेच महिला, एससी/एसटी आणि एक्स सर्विसमॅन यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागू नाही आहे.

अर्ज शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज शुल्क भरताना व्यवहार यशस्वी झाला आहे की नाही हे उमेदवारांनी तपासून घ्यायचे आहे. अर्ज शुल्क बाबत अधिकृत जाहिरातीत नियम अंतिम मानले जाणार.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार ?

CSIR-NCL पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज 05 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे.

अंतिम तारखेच्या दिवशी वेबसाईटवर तांत्रिक अडचण येऊ शकतात त्यामुळे उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामध्ये दहावीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि लागू असल्यास जात किंवा इतर आरक्षणासंबंधी प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

नेमकी कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासायची आहे.

अर्ज कसा करायचा आहे ?

CSIR-NCL पुणे मध्ये मल्टी टेस्टिंग स्टाफ या पदासाठी अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी CSIR-NCL पुणे जे अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • भरती विभागातील संबंधित रिक्रुटमेंट किंवा करिअर लिंक शोधायची आहे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ भरतीचे अधिकृत जाहिरात उघडायचे आहे.
  • जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता तपासून घ्यायची आहे.
  • ऑनलाइन अर्जाची लिंक उघडायची आहे.
  • मागितलेले वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूकपणे भरायची आहे.
  • आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अपलोड करायचे आहे.
  • लागू असल्यास उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी पुन्हा माहिती नीट तपासून घ्यायची आहे.
  • तपासून झाल्यावर यशस्वीपणे उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचे आहे आणि त्यानंतर पावती किंवा पीडीएफ सेव करून ठेवायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment