केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 110 पदांची भरती सुरू!! CPRI Bharti 2026

CPRI Bharti 2026 : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थां मध्ये विविध पदांची मोठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1, अभियांत्रिकी सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ श्रेणी-1, तांत्रिक परिचर श्रेणी-1, सहाय्यक श्रेणी-2 आणि बहु-कार्य कर्मचारी (MTS) श्रेणी-1 या पदांचे एकूण 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार संबंधित पदासाठी अर्ज करता येईल येणार. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे. केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थां या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अंतिम तारीख ही 12 ऑक्टोबर 2026 असे आहे.

पदांची माहिती

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थां या भरतीमध्ये अभियांत्रिकी, विज्ञान, तांत्रिक आणि कार्यालयीन स्वरूपाचे विविध पदांचे समावेश केले आहे त्यामुळे पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा दिला आहे.

पदांची नावेरिक्त जागा
अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1 (विद्युत)07
अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1 (स्थापत्य)01
अभियांत्रिकी सहाय्यक (विद्युत)10
अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक)01
वैज्ञानिक सहाय्यक02
तंत्रज्ञ श्रेणी-1 (विद्युत)07
तंत्रज्ञ श्रेणी-1 (यांत्रिक)02
तांत्रिक परिचर श्रेणी-137
सहाय्यक श्रेणी-229
बहुकार्य कर्मचारी (MTS) श्रेणी-114

वरती दिलेल्या माहितीनुसार एकूण 110 पदे भरली जाणार आहे. काही पदांमध्ये दिव्यांग उमेदवार तसेच माजी सैनिकांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तांत्रिक परिचर आणि सहाय्यक पदांमध्ये संबंधित प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आले आहे. MTS श्रेणी-1 या मध्ये सर्व पदे माजी सैनिक साठी राखीव असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीमध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची पात्रता पूर्ण आहे का त्यांनी तपासून घ्यायचे आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली दिले आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1 (विद्युत)मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी किंवा विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विषयांमध्ये प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी असणे आवश्यक आहे. तसेच 2024, 2025 किंवा 2026 मधील वैध GATE गुण आवश्यक आहेत
अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1 (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी असणे आवश्यक आहे. तसेच 2024, 2025 किंवा 2026 मधील वैध GATE गुण आवश्यक आहेत
वैज्ञानिक सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयांमध्ये प्रथम श्रेणीतील बीएससी पदवी आणि संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचे अनुभव असणे आवश्यक
अभियांत्रिकी सहाय्यक (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणीतील तीन वर्षाचे डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील पाच वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे.
अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक)यांत्रिक अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणीतील तीन वर्षाचे डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रामध्ये पाच वर्षाचे अनुभव असणे आवश्यक
तंत्रज्ञ श्रेणी-1 (विद्युत)विद्युत ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
तांत्रिक परिचर श्रेणी-1 आणि सहाय्यक श्रेणी-2मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्युत किंवा यांत्रिक ट्रेडमध्ये दोन वर्षाचे आयटीआय ट्रेड प्रमाणपत्र असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार.

प्रथम श्रेणीतील बीए, बीएससी, बीकॉम, बीबीए, बीबीएम आणि बीसीए पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबतच NIELIT मधून घेण्यात आलेले बेसिक कम्प्युटर कोर्स अर्थात बीसीसी चे किमान ग्रेड-बी प्रमाणपत्र अर्जाच्या अंतिम तारखेला वेद असणे आवश्यक आहे. या पदासाठी इतर कोणत्याही संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही अशी अट जाहिरातीत नमूद केली आहे.
बहुकार्य कर्मचारी (MTS) श्रेणी-1मान्यताप्राप मंडळामधून दहावी किंवा संपक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी सर्व जागा माजी सैनिक यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

वेतनश्रेणी

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थां मध्ये उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी मिळणार आहे. उमेदवारांनी आपल्या पदानुसार वेतन श्रेणी खाली तपासून घ्यायचे आहे.

पदांची नावेवेतनश्रेणी
अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1 (विद्युत)वेतन स्तर 07, 44,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये
अभियांत्रिकी सहाय्यकवेतन स्तर 06, 35.400/- रुपये ते 1,12,400/- रुपये
वैज्ञानिक सहाय्यकवेतन स्तर 06, 35.400/- रुपये ते 1,12,400/- रुपये
सहाय्यक श्रेणी-2वेतन स्तर 04, 25.500/- रुपये ते 81,100/- रुपये
तांत्रिक श्रेणी-1वेतन स्तर 02, 19.900/- रुपये ते 63,200/- रुपये
तांत्रिक परिचर श्रेणी-1वेतन स्तर 01, 18.000/- रुपये ते 56.900/- रुपये
बहुकार्य कर्मचारी (MTS) श्रेणी-1वेतन स्तर 01, 18.000/- रुपये ते 56.900/- रुपये

इतर बत्ते आणि सेवासुविधा लागू नियमानुसार वेतन व्यतिरिक्त मिळू शकतात.

अर्ज शुल्क

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये भरतीसाठी पदानुसार अर्ज शुल्क वेगवेगळे आहे.

पदांची नावेअर्ज शुल्क
अभियांत्रिकी अधिकारी श्रेणी-1, वैज्ञानिक सहाय्यक आणि अभियांत्रिकी सहाय्यक1000/- रुपये अर्ज शुल्क आहे
तंत्रज्ञ श्रेणी-1, सहाय्यक श्रेणी-2 आणि तांत्रिक परिचर श्रेणी-1700/- रुपये अर्ज शुल्क आहे
बहुकार्य कर्मचारी (MTS) श्रेणी-1या पदासाठी जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे या सर्व जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत त्यामुळे उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे

अर्ज शुल्क भरताना उमेदवारांनी अधिकृत जाहिरात मध्ये अर्ज शुल्क भरायचे नियम तपासून घ्यायचे आहे.

अर्ज कसा करायचा आहे ?

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थां मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार योग्य पदाची निवड करायची आहे. ऑनलाइन अर्जामध्ये मागितलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि अनुभवाची माहिती आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरायची आहे.

आवश्यक कागदपत्रे सूचनेनुसार अपलोड करायचे आहेत. अर्ज शुल्क लागू असल्यास ते ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज पूर्ण केल्यानंतर तो अंतिम स्वरूपात सबमिट करून अर्जाची प्रत जतन करून ठेवणे योग्य राहणार आहे भविष्यातील संदर्भासाठी.

उमेदवारांनी अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नये. पात्रता, अनुभव, प्रमाणपत्र आणि आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे यांची माहिती योग्य प्रमाणे भरणे आवश्यक आहे. माहिती अपूर्ण किंवा पात्रता अटी पूर्ण नसल्यास उमेदवारांचे अर्ज नाकारले जाणार.

महत्त्वाची तारीख

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था मध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 ऑक्टोबर 2026 असे आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाच्या अगोदर वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.

महत्त्वाची सूचना

या भरतीमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक आणि अनुभवाची अट लागू आहेत. त्यामुळे केवळ पदांची संख्या पाहून अर्ज न करता आपल्या पात्रतेनुसार योग्य पदाची निवड करणे आवश्यक आहे. विशेष करून GATE गुण, आयटीआय प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी आणि इतर अटी आणि अनुभव महत्त्वाचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था कडून जी मूळ व अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे त्यामध्ये सर्व महत्त्वाच्या माहिती वाचून घ्यायची आहे आणि अर्ज करायचे आहे.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

1 thought on “केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत 110 पदांची भरती सुरू!! CPRI Bharti 2026”

Leave a Comment