Supreme Court Bharti 2026 : भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदासाठी 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि ज्यांना संगणक आणि इंग्रजी टायपिंग चे चांगले ज्ञान आहे ते या भरतीसाठी पात्र ठरणार आहे. त्यांच्यासाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाकून घ्यायचे आहे आणि आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, टायपिंगची अट आणि इतर पात्रता तपासून घ्यायचे आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया ही 07 ऑक्टोबर 2026 सकाळी 10:00 वाजता पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 ऑक्टोबर 2026 रात्री 11:55 वाजेपर्यंत राहणार आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आपली पात्रता तपासून या भरतीसाठी व पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांची माहिती
भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली या भरतीमध्ये कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदासाठी एकूण 250 रिक्त जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांनी रिक्त पदांची संख्या, आरक्षण आणि इतर माहितीसाठी अधिकृत भरती जाहिरात तपासून घ्यायची आहे. सरकारी भरतीमध्ये पदांची संख्या किंवा इतर अटी मध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे आणि अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच उमेदवाराला संगणक याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि त्यावर इंग्रजी टायपिंग किमान 35 शब्द प्रति मिनिट ही पात्रता असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पदवी सोबत संगणक वापराचे ज्ञान आणि इंग्रजी टायपिंगची क्षमता याची माहिती तपासून घ्यायची आहे आणि तेव्हाच या भरतीसाठी अर्ज करायचे आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2026 किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्ष असे असणे आवश्यक आहे.
आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सवलत दिली जाणार. वयाची अचूक गणना करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत नियम तपासून घ्यायचे आहे.
अर्ज शुल्क
सामान्य प्रवर्गाच्या उमेदवारांना 1500/- रुपये अर्ज शुल्क आणि त्यासोबत बँक शुल्क लागणार आहे.
एससी/एसटी, ओबीसी, एक्स सर्विसमॅन या उमेदवारांसाठी 750/-रुपये अर्ज शुल्क आणि त्यासोबत बँक शुल्क लागणार आहे.
अर्ज शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची पावती किंवा व्यवहाराची प्रत जतन करून ठेवायची आहे भविष्य मध्ये कामी येऊ शकते.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये होणार आहे. अधिकृत जाहिरातीमध्ये उपलब्ध माहितीनुसार निवड प्रक्रिया मध्ये खालील माहितीचा समावेश आहे.
- ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा
- ऑब्जेक्टिव्ह टाईप संगणक ज्ञान परीक्षा
- डिस्क्रिप्टिव टेस्ट
- इंटरव्यू
वरती दिलेल्या माहितीनुसार उमेदवाराची कामासाठी प्रत्येक टप्प्यात क्षमता तपासली जाणार आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम, गुणपद्धती, पात्रता गुण आणि इतर नियम अधिकृत जाहिरातीत दिलेले आहेत ते उमेदवारांनी वाचून घ्यायचे आहे.
वेतन
कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदासाठी सहाव्या वेतनुसार वेतन देण्यात येणार आहे. या पदाचे सुरुवातीचे मूळ वेतन 35,400/-रुपये असे असणार आहे.
वरती दिलेल्या वेतन सोबत केंद्र सरकारचे इतर भत्ते सुद्धा मिळणार आहे. वेतन आणि इतर भत्ते यांची माहिती व नियम बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
उत्तर तालिका वर आक्षेप
परीक्षानंतर उपलब्ध होणाऱ्या उत्तर तालिका बाबत उमेदवाराला आक्षेप नोंदवायची सुविधा दिली जाऊ शकते. दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक आक्षेपासाठी 100/-रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
जर उमेदवाराचे आक्षेप योग्य असल्याचे आढळले जाणार तर संबंधित शुल्क परत दिले जाणार. या संबंधित संपूर्ण माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत तपासायची आहे.
अर्ज कसा करायचा आहे ?
भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या सूचनाप्रमाणे सर्व कागदपत्र व इतर माहिती तयार ठेवून दिलेल्या सूचनानुसार सामान्य प्रक्रियेने अर्ज करायचा आहे.
- सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- संबंधित भरती विभागातील कनिष्ठ न्यायालय सहायक 2026 ही जाहिरात शोधायची आहे.
- त्यानंतर उमेदवारांनी पीडीएफ काळजीपूर्वक वाचायची आहे.
- ऑनलाइन अर्जाची लिंक शोधून ती उघडायची आहे.
- सर्व मागितलेली वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर माहिती अचूकपणे भरायचे आहे.
- आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र/स्वाक्षरी दिलेले नियमानुसार अपलोड करायचे आहे.
- लागू असलेले अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- सर्व माहिती तपासून अंतिम स्वरूपात अर्ज सबमिट करायची आहे.
- अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची पावती डाऊनलोड करून जतन करून ठेवायची आहे.
अर्जामध्ये उमेदवारांनी चुकीची माहिती भरायची नाही आहे जर चुकीची माहिती भरली गेली तर उमेदवारांना पुढील प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे.
महत्त्वाच्या तारखा
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 07 ऑक्टोबर 2026 सकाळी 10:00 वाजता सुरू होणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 ऑक्टोबर 2026 असे आहे आणि अंतिम वेळ रात्री 11:55 पर्यंत दिला आहे.
उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्णपणे योग्य पद्धतीने भरायचा आहे कारण शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचण किंवा इंटरनेटच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकते.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |