भारत-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या जागांसाठी भरती सुरू!! ITBP Head Constable Bharti 2026

ITBP Head Constable Bharti 2026 : भारत-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) या पदासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 21 रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येणार आहे. उमेदवार ज्यांना वाहन दुरुस्ती आणि मोटर मेकॅनिक या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या पात्र उमेदवारांनी या सरकारी नोकरीची संधी घ्यायची आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही 28 सप्टेंबर 2026 सुरू होणार आहे आणि 27 ऑक्टोबर 2026 या तारखेला बंद होणार आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी अंतिम तारखेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून द्यायचे आहे आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अनुभव आणि इतर आवश्यक अटी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

पदाची माहिती

भारत-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये जी भरती निघाली आहे त्या भरतीमध्ये पदाचे नाव हे हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) असे आहे. हे पद जनरल सेंट्रल सर्विस, ग्रुप सी नॉन गॅजेट, नॉन मिनिस्टरियल या पदाचा दर्जा आहे. गृह मंत्रालय, भारत सरकार या अंतर्गत ही संस्था कार्यरत आहे आणि एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा आहे.

पदांची संख्या

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) या पदासाठी एकूण 21 पदे रिक्त आहेत. प्रवर्गानुसार पदांचे वितरण खालील प्रमाणे दिले आहेत.

प्रवर्गपदांची संख्या
सामान्य07
एससी04
एसटी00
ओबीसी07
ईडब्ल्यूएस03
एकूण21

वरती दिलेली पदसंख्या ही तात्पुरती आहे. प्रशासकीय कारणांमुळे पदांची संख्या वाढू किंवा कमी होऊ शकते. त्या संबंधित माहिती अधिकृत भरती संकेतस्थळावर देण्यात येणार.

उपलब्ध माहितीनुसार एकूण रिक्त पदांपैकी दहा टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहे. पात्र माजी सैनिक उपलब्ध नसल्यास संबंधित प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांमधून ही पदे भरली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेमधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यासोबत खाली दिलेल्या आवश्यक पात्रता असणे सुद्धा अपेक्षित आहे.

  • मान्यताप्राप्त संस्था किंवा आयटीआय ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून मोटर मेकॅनिक या ट्रेड चे प्रमाणपत्र आणि नामांकित वर्कशॉप मधून संबंधित ट्रेड मध्ये तीन वर्षाचे व्यवहारिक अनुभव असले पाहिजे किंवा
  • ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये तीन वर्षाचे डिप्लोमा उत्तीर्ण असले पाहिजे.

फक्त बारावी उत्तीर्ण असणे पुरेसे नसून मोटर मेकॅनिक ट्रेडमध्ये आवश्यक प्रमाणपत्र, अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा यापैकी संबंधित अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात मध्ये दिलेले शैक्षणिक पात्रता चे सर्व अटी तपासून घ्यायचे आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्ष असे असावे.

वयोमर्यादा निश्चित करण्याची तारीख तसेच, एससी/एसटी, ओबीसी, माजी सैनिक किंवा इतर पात्र प्रवर्गासाठी लागू असलेले वयोमर्यादा सवलत या संबंधित माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहून घ्यायचे आहे आणि अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना वाचणे हे महत्त्वाचे आहे.

वेतन

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) या पदासाठी सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार दिले जाणार आहे.

या भरतीच्या माहितीनुसार वेतनश्रेणी लेव्हल-04 मध्ये 25,500/-रुपये ते 81,100/-रुपये आणि संबंधित वेतन स्तरानुसार लेव्हल-03 मध्ये 21,700/-रुपये ते 69,100/-रुपये अशी नमूद करण्यात आली आहे.

याच्याशिवाय केंद्र सरकारच्या नियमानुसार लागू असलेले भत्ते आणि इतर सेवा सुविधा पात्रतेनुसार देण्यात येणार.

अर्ज शुल्क

भारत-तिबेट सीमा पोलीस दल या भरतीसाठी उमेदवारांना जे सामान्य प्रवर्ग, ओबीसी प्रवर्ग, ईडब्ल्यूएस प्रवर्ग यांना 100/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे. एससी/एसटी, माजी सैनिक या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.

अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्यापूर्वी अधिकृत पोर्टलवरील अर्ज शुल्क संबंधित सूचना तपासून घ्यायची आहे.

महत्त्वाच्या तारखा

भारत-तिबेट सीमा पोलीस दल या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात आणि अंतिम तारीख उमेदवारांनी खालील दिलेल्या प्रमाणे पाहून घ्यायचे आहे.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख28 सप्टेंबर 2026
ऑनलाईन अर्ज करायची अंतिम तारीख27 ऑक्टोबर 2026

उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अंतिम तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे.

निवड प्रक्रिया

भारत-तिबेट सीमा पोलीस दल या भरतीमध्ये हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) या पदासाठी उमेदवारांची निवड अनेक टप्प्यांमधून केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार निवड प्रक्रियेमध्ये पुढील टप्प्यांचा समावेश आहे खालील प्रमाणे.

  • फिजिकल एफिशियन्सी टेस्ट (PET)
  • फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST)
  • कागदपत्र पडताळणी
  • लेखी परीक्षा
  • स्किल टेस्ट
  • मेडिकल एक्झामिनेशन
  • मेडिकल एक्झामिनेशन

फिजिकल एफिशियन्सी टेस्ट (PET) हा पात्रता स्वरूपाचा टप्पा असेल. फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) मध्ये उमेदवारांची शारीरिक पात्रता निर्धारित निकषानुसार तपासण्यात येणार. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, लेखी परीक्षा आणि मोटर मेकॅनिक ट्रेड संबंधित कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे.

वैद्यकीय तपासणी मध्ये उमेदवारांची वैद्यकीय पात्रता संबंधित नियमानुसार तपासले जाणार.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

  • सर्वप्रथम उमेदवारांनी ITBP च्या अधिकृत भरती संकेतस्थळाला भेट द्या.
  • नवीन भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक उमेदवारांनी शोधायची आहे.
  • आवश्यक असल्यास नवीन नोंदणी करा.
  • अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरायचे आहे.
  • आवश्यक कागदपत्र आणि स्वाक्षरी/छायाचित्र तिथे मागितलेल्या पद्धतीने अपलोड करायचे आहे.
  • ज्या उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क लागू आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्जातील सर्व माहिती उमेदवारांनी पुन्हा तपासून घ्यायचे आहे.
  • अंतिम स्वरूपात अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्जाची पावती किंवा प्रत भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवायचे आहे.

ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहे त्यांनी वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. भरतीची संबंधित प्रक्रिये संबंधित महत्वाची सूचना इ-मेल द्वारे मिळू शकते किंवा अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्जऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

1 thought on “भारत-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या जागांसाठी भरती सुरू!! ITBP Head Constable Bharti 2026”

Leave a Comment