सैनिक स्कूल सातारा मध्ये विविध पदांची भरती सुरू… 09 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा!!! Sainik School Satara Bharti 2026

Sainik School Satara Bharti 2026 : सैनिक स्कूल सातारा अंतर्गत विविध पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे. सैनिक स्कूल्स सोसायटी, संरक्षण मंत्रालयाचे अंतर्गत येणाऱ्या सैनिक स्कूल मध्ये शालेय वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, घोडेसवारी प्रशिक्षक, क्वार्टर मास्टर, वॉर्ड बॉय, पीईएम/पीटीआय सह मॅट्रन आणि नर्सिंग सिस्टर या पदांसाठी एकूण 08 रिक्त जागा निघाल्या आहेत.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहे. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया ही 22 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 09 ऑक्टोबर 2026 असे आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटचे तारखेच्या अगोदर लवकरात लवकर आपल्या शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी तपासून अर्ज करायचे आहे.

ही भरती सातारा येथे होणार आहे आणि पदानुसार उमेदवारांना दरमहा 23,000 रुपये ते 40,000 रुपये मानधन असे दिले जाणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली वाचून घ्यायचे आहे व तसेच अधिकृत जाहिरातीत वाचायचे आहे.

पदांची माहिती

सैनिक स्कूल सातारा मध्ये एकूण 08 जागा उपलब्ध आहेत. या 08 जागांसाठी पदांची नावे हे शालेय वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, घोडेसवारी प्रशिक्षक, क्वार्टर मास्टर, वॉर्ड बॉय, पीईएम/पीटीआय सह मॅट्रन आणि नर्सिंग सिस्टर याप्रमाणे दिले आहे.

  • शालेय वैद्यकीय अधिकारी – 01 जागा

या पदासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित वैद्यकीय कामकाजी जबाबदारी या पदावर असणार आहे.

मानधन : 40,000/-रुपये प्रति महिना.

  • समुपदेशक – 01 जागा

समुपदेशक पदासाठी सायकॉलॉजी विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह पात्र असलेले उमेदवार स्वीकार केले जातील. तसेच चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये पदव्युत्तर शिक्षण किंवा कॅरिअर गायडन्स आणि कौन्सिलिंग मध्ये डिप्लोमा असलेले उमेदवार सुद्धा पात्र असणार आहेत किमान 50 टक्के गुणांची अट आहे.

मानधन : 39,000/-रुपये प्रति महिना.

  • घोडेसवारी प्रशिक्षक – 01 जागा.

या पदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि घोड्यांचे व्यवस्थापन, तबल्याची देखभाल, घोड्यांचे आरोग्य, स्वच्छता, उपचार आणि घोडेसवारी खेळ यांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

मानधन : 28,000/-रुपये प्रति महिना.

  • क्वार्टर मास्टर – 01 जागा.

क्वार्टर मास्टर या पदासाठी उमेदवार हा बीए किंवा बीकॉम पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच संबंधित उमेदवाराला UDC स्टोअर्स युवा क्वार्टर मास्टर म्हणून पाच वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच स्टोअर चे व्यवस्थापन आणि हिशोब ठेवण्याचा अनुभव पाहिजे. माजी सैनिक यांना किमान दहा वर्षाचे स्टोर हाताळणीचे अनुभव असलेले JCO यांना पात्रतेनुसार संधी मिळू शकणार.

मानधन : 32,000/-रुपये प्रति महिना.

  • वॉर्ड बॉय – 02 जागा

हे पद मुलांच्या वस्तीगृहांसाठी आहे हॉस्टेल सुप्रीटेंडंट यांच्या कामाशी संबंधित जबाबदाऱ्या असणार आहेत. उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच इंग्रजी भाषेमध्ये संवाद करता येणे आवश्यक आहे.

मानधन : 28,000/-रुपये प्रति महिना.

  • PEM/PTI सह मॅट्रन – 01 जागा

हे पद मुलींच्या वस्तीगृहासाठी आहे आणि उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यासोबतच इंग्रजी भाषेचे संवाद करता आले पाहिजे या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला मुलींच्या वस्तीगृहातील निवासीचा सुविधा स्वीकारून तिथे राहावे लागणार आहे.

मानधन : 28,000/-रुपये प्रति महिना.

  • नर्सिंग सिस्टर – 01 जागा

नर्सिंग सिस्टर या पदासाठी नर्सिंग मध्ये पदविका किंवा पदवी आणि त्यासोबतच पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर किमान पाच वर्षाची सेवा पूर्ण केलेले मेडिकल असिस्टंट ट्रेड मध्ये माजी सैनिक देखील संबंधित अटीनुसार पात्र असणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शाळेच्या कॅम्पस मध्ये राहावे लागणार आहे याची तयारी उमेदवारांनी ठेवायची आहे.

मानधन : 28,000/-रुपये प्रति महिना.

वयोमर्यादा

सैनिक स्कूल सातारा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 50 वर्षे याप्रमाणे दिले गेले आहे आणि वयाची गणना ही 09 ऑक्टोबर 2026 रोजी केली जाणार आहे. वयोमर्यादा संबंधित संपूर्ण अटी व माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे आणि आपल्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा पाहून घ्यायचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी सामान्य प्रवर्गाच्या उमेदवारांना आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 250/-रुपये अर्ज शुल्क निश्चित केले गेले आहे आणि एससी/एसटी या प्रवर्गाच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागू केले गेले नाही आहे.

सामान्य आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 250 रुपयांचा नॉन रिफेंडेबल डीडी अर्जासोबत जोडायचे आहे.

अर्ज करण्याची पद्धत

सैनिक स्कूल सातारा मध्ये भरती होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचे अर्ज उपलब्ध नसून उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित पदासाठी आपले पात्र निश्चित करायचे आहे अधिकृत जाहिरातीमध्ये बघून.

अर्ज मध्ये मागितलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरायची आहे जसे की शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक कागदपत्रांची प्रति अर्जासोबत जोडायचे आहे. अर्जावर आवश्यक ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे आणि अर्ज शुल्क लागू असल्यास संबंधित डीडी जोडायचा आहे.

त्यानंतर अर्ज पूर्ण योग्य पद्धतीने तयार करून दिलेल्या पत्त्यावर पोस्ट द्वारे जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचा आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता – मुख्याध्यापक,
सैनिक स्कूल सातारा,
PO Box No-20, सदर बाजार,
जिल्हा-सातारा, महाराष्ट्र – 415001.

या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे

पदाच्या आवश्यकतेनुसार अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभवाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, वयाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रांसोबत प्रति मागितल्या जाऊ शकतात त्यामुळे अर्ज पाठवण्यापूर्वी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचून घ्यायचे आहे. ज्या पदासाठी अनुभवाची अट आहे त्या उमेदवारांनी अनुभवाच्या वैद्य पुरावा जोडणे आवश्यक आहे चुकीचा किंवा अपूर्ण माहिती असल्यास उमेदवारांचे अर्ज बाद होऊ शकतो याची खात्री उमेदवारांनी ठेवायची आहे.

महत्त्वाच्या तारखा

सैनिक स्कूल सातारा मध्ये भरती होण्यासाठी अर्ज प्रक्रिया 22 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 09 ऑक्टोबर 2026 असे आहे. अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवून द्यायचा आहे.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
एप्लीकेशन फॉर्मएप्लीकेशन फॉर्म लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment