Nashik Kotwal Bharti 2026 : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि नाशिक जिल्ह्यात सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा यांच्या अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 156 रिक्त पदे नियुक्त करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पदे उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, बागलाण, देवळा, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, चांदवड, निफाड, येवला, सिन्नर, मालेगाव, नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे.
या पदासाठी उमेदवार हा किमान 04थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आणि स्थानिक उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची ठरू शकते. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे आणि काळजीपूर्वक सर्व अटी वाचून घ्यायचे आहे.
पदांची माहिती
नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये कोतवाल या पदासाठी रिक्त जागा निश्चित करण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार तालुका प्रमाणे रिक्त पदे खाली दिले दिले आहे.
- नाशिक – 16 पदे
- सुरगाणा – 12 पदे
- त्र्यंबकेश्वर – 03 पदे
- पेठ – 04 पदे
- बागलाण – 26 पदे
- देवळा – 08 पदे
- इगतपुरी – 10 पदे
- दिंडोरी – 16 पदे
- कळवण – 14 पदे
- चांदवड – 04 पदे
- निफाड – 11 पदे
- येवला – 05 पदे
- सिन्नर – 07 पदे
- मालेगाव – 14 पदे
- नांदगाव – 06 पदे
एकूण सर्व 156 रिक्त पदे आहेत. उमेदवारांनी अर्ज करताना आपल्या संबंधित क्षेत्रातील लागू असलेल्या अटी आणि पदांची माहिती जाहिराती तपासून घ्यायची आहे.
शैक्षणिक पात्रता
नाशिक कोतवाल भरती साठी उमेदवार हा किमान 04थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता वैतरिक्त जाहिरातीत नमूद केलेल्या इतर पात्रता आणि अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
उमेदवार हा संबंधित क्षेत्रातील गावाच्या रहिवासी असणे आवश्यक असल्याचा पात्रता निकषांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या रहिवासी संबंधित अटी लागू होतात का ते तपासणे उमेदवारांना महत्त्वाचे आहे.
तसेच उमेदवार शारीरिक दृष्टीने शिक्षण असणे सुद्धा आवश्यक आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असू शकते.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 03 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असले पाहिजे.
शासनाच्या नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा नुसार सूट मिळणार आहे. माहितीनुसार अनुसूचित जाती आणि जमाती या उमेदवारांना 05 वर्ष आणि इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार सवलत लागू होणार आहे.
वेतन
महसूल सेवक (कोतवाल) या पदासाठी दर महिना 15,000/-रुपये मानधन देण्यात येणार. या पदाचे मानधन आणि सेवेसी संबंधित इतर अटी तपासण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून घ्यायचे आहे.
सरकारी कार्यालयाशी संबंधित कामाचा अनुभव मिळवू इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी प्रवर्तन नुसार अर्ज शुल्क लागू करण्यात आले आहे.
सामान्य प्रवर्गाच्या उमेदवारांना 600/- रुपये अर्ज शुल्क लागू केले आहे आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना 500/-रुपये अर्ज शुल्क लागू करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतर मिळणारी पावती किंवा अर्जाची प्रत उमेदवारांनी सांभाळून ठेवायचे आहे भविष्यामध्ये कामासाठी योग्य ठरू शकते.
निवड प्रक्रिया
नाशिक कोतवाल भरतीसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा द्वारे केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार परीक्षा 100 गुणांची असणार आहे.
लेखी परीक्षेचा अभ्यास करताना उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप आणि इतर सूचना काळजीपूर्वक तपासून घ्यायचे आहे. परीक्षेची तयारी करताना मूलभूत सामान्य ज्ञान, संबंधित विषय आणि जाहिरातीत नमूद केलेल्या अभ्यासक्रमावर लक्ष देणे उपयुक्त ठरणार आहे.
निवड प्रक्रियेतील अंतिम नियम आणि इतर टप्पे अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
नाशिक कोतवाल भरती यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू झाली आहे.
पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत अर्ज संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. आणि अर्ज मध्ये आपले वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील अचूकपणे भरायचे आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 05:45 वाजेपर्यंत आहे. अंतिम तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे कारण उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना जर अंतिम तारखेची वाट पाहिली तर अंतिम तारखेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तांत्रिक अडचण येऊ शकते त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी आधीच अर्ज करायचा आहे हे योग्य ठरणार आहे आणि उपयुक्त ठरणार आहे.
अर्ज कसा करायचा आहे ?
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत अर्ज संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे.
- भरतीची अधिकृत जाहिरात वाचून आपली पात्रता तपासून घ्यायची आहे.
- ऑनलाइन अर्जाची लिंक उघडायची आहे.
- आवश्यक व्यक्ती आणि शैक्षणिक माहिती उमेदवारांनी अर्जामध्ये भरायची आहे.
- आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती जाहिरातीनुसार सादर करायचे आहे.
- आपल्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क भरायचे आहे.
- अर्जातील सर्व माहिती उमेदवारांनी पुन्हा तपासून घ्यायची आहे.
- त्यानंतर उमेदवारांनी अर्ज सबमिट करायचा आहे.
- सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत आणि शुल्क पावती जतन करून ठेवायची आहे.
उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी ?
सरकारी भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवारांनी आपले नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे. चुकीचं माहिती असल्यास उमेदवारांचे अर्ज बाद होऊ शकतो.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात मध्ये पात्रता, रहिवासीची अट, वयोमर्यादा, शुल्क, परीक्षा आणि इतर नियम तपासून घ्यायचे आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |