Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 38 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या 38 रिक्त पदांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, निओनेटोलॉजिस्ट, फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ आणि इंटेन्सिव्हिस्ट या पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे आणि उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार संबंधित पदासाठी अर्ज करावा. पुणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे व मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ही 17 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी कुठे आणि कसे हजर राहायचे आहे ती सर्व माहिती उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे. पुणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी व काम करण्यासाठी उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी चांगला लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. सविस्तर माहिती वाचा.
पदांचे नाव
पुणे महानगरपालिकेअंतर्गत या भरतीमध्ये खालील पदांवर नियुक्ती केली जाणार आहे स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ), फिजिशियन, त्वचारोग तज्ञ, क्ष किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट), इंटेसिव्हिस्ट याप्रमाणे दिले गेले आहे. वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे आणि उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार संबंधित पदासाठी अर्ज करावा.
पदांची संख्या
पुणे महानगरपालिका मध्ये एकूण 38 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या 38 रिक्त पदांचे पदनिहाय विभाजन खालील तक्त्यात दिले आहे.
| पदांचे नाव | पदांची संख्या |
| स्त्री रोग तज्ञ | 08 |
| बालरोग तज्ञ | 09 |
| निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ) | 02 |
| फिजिशियन | 10 |
| इंटेसिव्हिस्ट | 03 |
| त्वचारोग | 01 |
| क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) | 05 |
शैक्षणिक पात्रता
पुणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता खाली टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे पदानुसार शैक्षणिक पात्रता खाली बघा.
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| स्त्रीरोग तज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस व डीजी ओ उत्तीर्ण असणे आवश्यक |
| बालरोग तज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD (बालरोग) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एमबीबीएस व डीजीओ उत्तीर्ण असणे आवश्यक |
| निओनेटोलॉजिस्ट (नवजात अर्भक तज्ज्ञ) | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून डीएम (निओनेटोलॉजिस्ट) पदवी किंवा एमडी पिडिया ट्रिक्स नंतरचे नियोनेटोलॉजी विषयांमध्ये भारतीय बालरोग अकादमी/भारतीय वैद्यकीय परिषद फेलोशिप किंवा एमडी पीडिया ट्रिक्स नंतरचे नियोनेटोलॉजी विषयांमध्ये डीएनबी (निओनेटोलॉजी) किंवा समक्ष पदवी असणे आवश्यक |
| फिजिशियन | शासनमान्य विद्यापीठामधून एमडी (मेडिसिन) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक |
| इंटेसिव्हिस्ट | एमडी (मेडिसिन) व इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स प्रथम प्राधान्य दिले जाणार. एमडी (मेडिसिन) द्वितीय प्राधान्य दिले जाणार. एमडी (अॅनेस्थेशिया) वहिमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स तृतीय प्राधान्य दिले जाणार किंवा एमडी (अॅनेस्थेशिया) चतुर्थ प्राधान्य दिले जाणार. एमडी (चेस्ट) व इमर्जन्सी मेडिकल किंवा तत्सम कोर्स पंचम प्राधान्य दिले जाणार किंवा एम सी आर/महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ/डीएमईआर एसम वरिष्ठ अभ्यासक्रम निदर्शित करणाऱ्या संस्थेच्या नियमानुसार. |
| त्वचारोग तज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एमडी (त्वचारोग तज्ञ) |
| क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एमडी (क्ष-किरण तज्ञ) |
वयोमर्यादा
पुणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे तसेच मागासवर्गीय/राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे आहे. वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या पदानुसार वयोमर्यादा बघून घ्यायचे आहे.
नोकरीचे ठिकाण
पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीचे ठिकाण हे पुणे,महाराष्ट्र कसे आहे.
निवड प्रक्रिया व मुलाखतीचा पत्ता
पुणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत 17 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. दिलेल्या तारखेला उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, (जुना जीबी हॉल), पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, शिवाजीनगर पुणे 411005 येथे उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
उमेदवारांनी दिलेले तारखेला वरती दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. 17 सप्टेंबर 2026 नंतर या भरतीसाठी मुलाखत घेतली जाणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यायची आहे.
मुलाखतीसाठी उपस्थित कसे राहायचे ?
- पुणे महानगरपालिका मध्ये भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे.
- पुणे महानगरपालिका मध्ये इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी सर्व कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेस घेऊन हजर राहायचे आहे.
- मुलाखतीची तारीख ही 17 सप्टेंबर 2026 या रोजी आयोजित केले गेले आहे.
- मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्त्यावर टायमावर हजर राहायचे आहे आणि दिलेल्या तारखेलाच हजर राहायचे आहे कारण त्या तारखेनंतर कोणाचीही मुलाखत घेतली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या PDF जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |