Maharashtra Kotwal Bharti 2026 : महाराष्ट्रातील महसूल विभागांमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती प्रसारित केली गेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग मध्ये महसूल सेवक (कोतवाल) या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार 31 मे 2026 या तारखेच्या स्थितीनुसार महाराष्ट्र राज्य मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये महसूल सेवक (कोतवाल) या पदांची एकूण 2912 पदे भरले जाणार आहे.
या 2912 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही चूक उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यातील अधिकृत सूचना आणि जाहिरातीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि आपल्या जिल्ह्याप्रमाणे रिक्त पदे बघून अर्ज करायचे आहे.
रिक्त पदांची माहिती
महसूल व वन विभाग च्या पत्रानुसार राज्यात महसूल सेवक (कोतवाल) या पदांसाठी एकूण 12,978 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 10,066 पदे भरलेली असून 2912 पदे रिक्त आहेत.
ही संख्या 31 मे 2026 रोजी उपलब्ध असलेल्या पदस्थितीवर आधारित आहे त्यामुळे जिल्हा नुसार रिक्त पदांचा विचार करून संबंधित जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू करायचे आदेश दिले आहे.
उमेदवारांनी एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवायची आहे की सध्या उपलब्ध असलेली माहिती ही रिक्त पदांची आकडेवारी आणि भरती प्रक्रिया बाबतच्या सूचनेवर आधारित आहे. अर्ज कधी सुरू होतील, पात्रता काय असेल, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, आणि अर्ज प्रक्रिया कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती संबंधित जिल्ह्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कळवण्यात येणार व स्पष्ट होईल.
जिल्हा नुसार रिक्त पदे
उपलब्ध माहितीनुसार विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या महसूल सेवक पदांची संख्या पुढील प्रमाणे खाली दिली गेली आहे.
| जिल्ह्यांची नावे | रिक्त पदे |
| छत्रपती संभाजीनगर | 283 |
| जालना | 47 |
| परभणी | 64 |
| हिंगोली | 45 |
| नांदेड | 78 |
| बीड | 71 |
| लातूर | 62 |
| धाराशिव | 35 |
| नागपूर | 115 |
| वर्धा | 46 |
| गोंदिया | 58 |
| गडचिरोली | 39 |
| चंद्रपूर | 76 |
| भंडारा | 70 |
| अमरावती | 84 |
| अकोला | 80 |
| वाशिम | 41 |
| बुलढाणा | 85 |
| यवतमाळ | 108 |
| पुणे | 149 |
| सातारा | 91 |
| सांगली | 67 |
| सोलापूर | 114 |
| कोल्हापूर | 107 |
| नाशिक | 149 |
| धुळे | 47 |
| नंदुरबार | 45 |
| जळगाव | 86 |
| अहिल्यानगर | 101 |
| मुंबई उपनगर | 13 |
| ठाणे | 108 |
| पालघर | 123 |
| रायगड | 119 |
| रत्नागिरी | 64 |
| सिंधुदुर्ग | 42 |
विभागानुसार रिक्त पदांची संख्या
महाराष्ट्र मध्ये एकूण सहा महसूल विभागांच्या विचार गेला आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 685, नागपूर विभागामध्ये 404, अमरावती विभागात 398, पुणे विभागात 528, नाशिक विभागात 428 आणि कोकण विभागात 469 रिक्त पदे आहेत.
या सर्व विभागांची एकत्रित रिक्त पदांची संख्या ही 2912 असे आहे. मंजूर आणि भरलेल्या पदांसह राज्यातील एकूण मंजूर पदसंख्या 12,978 असून त्यापैकी फक्त 10,066 पदे भरली गेली आहेत.
भरतीचे वेळापत्रक
उपलब्ध भरती कार्यक्रमानुसार प्रक्रियेचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. 02 सप्टेंबर 2026 ते 08 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये तालुका नुसार रिक्त जागांची यादी तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 09 सप्टेंबर 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये रिक्त जागेनुसार बिंदू नामावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
16 सप्टेंबर 2026 रोजी परीक्षा भरतीसाठी समिती स्थापन करण्याचा टप्पा आहे. त्यानंतर 02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर 18 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांचे अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना 04 नोव्हेंबर 2026 ते ते 10 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उपलब्ध कार्यक्रमानुसार 11 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवारांची परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर 12 नोव्हेंबर 2026 रोजी उत्तर सूची आणि निकाल जाहीर करण्याचे टप्पा नमूद करण्यात आला आहे.
13 नोव्हेंबर 2026 ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवारांची नियुक्तीपत्र देण्याचा टप्पा आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया कोतवाल भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र कोतवाल विभागात काम करण्यासाठी महसूल सेवक (कोतवाल) या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये वाचून घ्यायची आहे व तसेच पदांचे पात्रता नुसार संपूर्ण माहिती बघण्याकरिता अधिकृत माहिती बघून घ्यायची आहे.
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| महसूल सेवक (कोतवाल) | किमान चौथी पास असणे आवश्यक आहे |
अर्ज कधी सुरू होणार आहे?
उपलब्ध वेळपत्रकानुसार 02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम अर्जाची तारीख आणि अर्जाची संबंधित अधिकृत जाहिरातीमधून निश्चित करायचे आहे.
जिल्ह्यानुसार प्रक्रिया असल्यामुळे सर्व जिल्ह्यांसाठी एकच अर्ज लिंक किंवा एकसारखी प्रक्रिया असेलच असे गृहीत धरू नये त्यामुळे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचनेनुसार अर्ज प्रक्रिया तपासणी योग्य राहणार.
उमेदवारांनी कोणती काळजी घ्यायची आहे ?
महसूल सेवक (कोतवाल) या भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सध्या उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यायचे आहे. केवळ सोशल मीडिया पोस्ट किंवा आणि अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच्या आधारावर अर्ज करायचे नाही आहे.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, आणि अर्ज करण्याची पद्धत यासंबंधीत आहे ती उमेदवारांना अधिकृत जाहिरातीमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व अटी काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचून घ्यायचे आहे.
जिल्ह्यानुसार रिक्त पदे वेगवेगळे असल्यामुळे उमेदवारांनी आपल्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत सूचना तपासायचे आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आपले नाव जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती अचूक भरायचे आहे आणि हे महत्त्वाचे आहे.
| अधिकृत पत्र | अधिकृत पत्र लिंक |
| अधिकृत पत्राचे वेळापत्रक | अधिकृत पत्राचे वेळापत्रक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट |
| महसूल व वन विभाग अधिकृत वेबसाईट | महसूल व वन विभाग अधिकृत वेबसाईट लिंक |