Cochin Shipyard Bharti 2026 : कोचिंग शिपयार्ड अंतर्गत विविध ट्रेड आणि आणि शैक्षणिक पात्रतेनुसार प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये आयटीआय ट्रेड, 10वी, 12वी/आयटीआय, डिप्लोमा तसेच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांची संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 227 जागेसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली गेली आहे.
आयटीआय किंवा इतर संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते त्यामुळे विविध ट्रेड नुसार जागेची संख्या वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपले शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्या ट्रेड साठी अर्ज करता येईल याची माहिती अधिकृत जाहिराती मध्ये तपासून घ्यायचे आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून अर्ज करण्याची अंतिम तारीख हीच 30 ऑक्टोबर 2026 असे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांची तयारी करून वेळेत अर्ज सादर करून द्यायचे आहे.
पदांची नावे
कोचिंग शिपयार्ड च्या भरतीमध्ये विविध शैक्षणिक पात्रता नुसार जागा निघाल्या आहेत त्यामुळे शैक्षणिक स्तरांनुसार ट्रेड आणि विषयांचा समावेश करण्यात आला आहे. आयटीआय ट्रेड मध्ये तांत्रिक कामाशी संबंधित अनेक ट्रेड आहेत जसे की इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशीनिस्ट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्समन, पेंटर, मोटर वेहिकल मेकॅनिक, शीट मेटल वर्कर, कार्पेंटर, डिझेल मेकॅनिक, प्लंबर तसेच इतर संबंधित ट्रेड चा समावेश आहे.
आयटीआय ट्रेड साठी एकूण जागेमध्ये इलेक्ट्रिशियन आणि फिटर साठी प्रत्येकी 10, जागा आहेत. वेल्डर साठी 09 जागा आहेत आणि मशीनिस्ट साठी 08 जागा आहेत आणि विविध ट्रेड साठी जागा देण्यात आल्या आहेत.
याच्याशिवाय 10वी पात्रता उमेदवार असलेल्यांसाठी ग्राइंडर इंटर्न, पेंटर इंटर्न आणि स्कॅफोल्डर इंटर्न या क्षेत्रामध्ये उमेदवारांना संधी उपलब्ध आहे आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी इंटर्न वेअर हाऊस सहाय्यक या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.
डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पात्र असल्या उमेदवारांसाठी विविध विषयांमध्ये प्रशिक्षणाच्या संधी आहेत. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, हिंदी, केटरिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट संबंधित विषयांचा समावेश आहे.
10वी आणि 12वी पात्रतेसाठी रिक्त पदे
फक्त 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी या भरतीमध्ये काही प्रशिक्षणाच्या संधी देण्यात आले आहेत. ग्राइंडर इंटर्न या पदासाठी एकूण 20 जागा आहेत आणि पेंटर इंटर्न या पदासाठी 30 जागा आहेत आणि स्कॅफोल्डर इंटर्न या पदासाठी 30 जागा आहेत.
फक्त 12वी पात्र असलेल्या उमेदवारांसाठी इंटर्न वेअर हाऊस सहाय्यक या पदासाठी 27 जागा उपलब्ध आहेत. संबंधित पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील सर्व अटी तपासून घ्यायचे आहे.
डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी रिक्त पदे
डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही कोचिंग शिपाईड भरतीमध्ये विविध पदांच्या समावेश केला गेला आहे.
सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या प्रत्येक विषयासाठी 02 जागा नमूद केले गेले आहेत. त्यासोबत केटरिंग/हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी आणि नर्सिंग या विषयासाठी 02 जागा नमूद केल्या आहेत.
क्लेरिकल क्षेत्रासाठी 11 जागा असून हिंदी विषयासाठी हिंदी इंटर्न ची 01 जागा आहे.
यामुळे तांत्रिक शिक्षणासोबतच काही गैर तांत्रिक आणि इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळू शकते.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांच्या संबंधित ट्रेड किंवा विषयानुसार निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार पात्रतेच्या प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे दिले आहेत.
आयटीआय ट्रेड साठी : उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण पाहिजे.
दहावी साठी : उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त बोर्ड मधून.
12वी/आयटीआय उत्तीर्ण साठी : उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण पाहिजे.
डिप्लोमा : संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा मान्यताप्राप्त संस्थांमधून विद्यापीठ किंवा तांत्रिक शिक्षण मंडळातून प्राप्त केलेला असला पाहिजे.
ग्रॅज्युएशन : बीए, बीएससी, बीकॉम, बीसीए यासारखी पदवी पात्रता असलेल्या उमेदवारांचे नमूद केले गेले आहे. बी टेक आणि परफॉर्मिंग आर्ट यांचा या निष्कात समावेश नाही.
पोस्ट ग्रॅज्युएशन : हिंदी विषयासाठी एम ए हिंदी किंवा एम ए हिंदी विथ ट्रान्सलेशन अशी पात्रता नमूद केली आहे.
शैक्षणिक पात्रतेबाबत शाखा, ट्रेड आणि इतर अटी वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचून घ्यायचे आहे.
वयोमर्यादा
कोचिंग शिपयार्ड मध्ये भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना सवलत दिली गेली आहे जसे ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादा मध्ये सूट आहे आणि एस सी/एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना पाच वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट आहे तसेच वयोमर्यादा संबंधित अजून माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
स्टायपेंड दरमहा किती मिळेल ?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दर महिन्याला स्टायपेंड दिली जाणार आहे.
आयटीआय ट्रेड : 11000/- प्रति महिना
दहावी : 11000/- प्रति महिना
बारावी/आयटीआय : 11000/- प्रति महिना
डिप्लोमा : 13000/- प्रति महिना
ग्रॅज्युएशन : 13000/- प्रति महिना
पोस्ट ग्रॅज्युएशन : 13000/- प्रति महिना
स्टायपेंड ची रक्कम संबंधित पात्रतेनुसार वेगवेगळी दिली आहे इतर सेवा अटी, प्रशिक्षण कालावधी आणि स्टायपेंड संबंधित संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये तपासून घ्यायचे आहे.
अर्ज कसा करायचा आहे :
कोचिंग शिपयार्ड भरती मध्ये उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोचिंग शिपाईडच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती संबंधित ऑनलाईन अर्जाची लिंक शोधायची आहे.
तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना आपल्या वेबसाईटवर खाली ऑनलाइन अर्ज लिंक दिली गेली आहे त्या लिंक वर जाऊन उमेदवार थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना उमेदवारांनी आपले नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरायची आहे. आवश्यक कागदपत्रे सांगितलेल्या स्वरूपात उमेदवारांनी अपलोड करायचे आहे. अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व भरलेली माहिती तपासून घ्यायची आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी पूर्णपणे भरल्यानंतर त्याची प्रत किंवा प्राप्त झालेली पावती सांभाळून ठेवायची आहे.
महत्त्वाच्या तारखा
कोचिंग शिपयार्ड भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 ऑक्टोबर 2026 असे दिले गेले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करून द्यायचा आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाईन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |