पर्यटन निरीक्षण पदासाठी एकूण 09 जागा, पदवीधरांना संधी..!! IRCTC Bharti 2026

IRCTC Bharti 2026 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IRCTC मध्ये पर्यटन क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीमध्ये पर्यटन निरीक्षण या पदाचे एकूण 09 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखती द्वारा केली जाणार आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये सहभागी, इच्छुक उमेदवारांनी या भरतीची पात्रता, वयोमर्यादा, वेतन, मुलाखतीची तारीख आणि ठिकाण याबाबत संपूर्ण माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक तपासून घेणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे कमाल वय हे 35 वर्षे असे दिले गेले आहे.

या भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज मागवले गेले नाही आहेत त्यामुळे उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसोबत जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेला उपस्थित राहायचे आहे.

पदाची माहिती

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड या भरतीमध्ये पर्यटन निरीक्षण या पदाची भरती केली जाणार आहे. या पदासाठी एकूण 09 जागा रिक्त आहेत. पर्यटन आणि प्रवासी संबंधित कामांसाठी रस असलेल्या उमेदवारांना ही संधी उपयुक्त ठरू शकते.

उमेदवारांनी पदांची संख्या आणि इतर तपशील समजून घेण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. अधिकृत जाहिरात मध्ये माहिती अंतिम मानली जाते.

शैक्षणिक पात्रता

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पर्यटन निरीक्षण या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी पात्र ठरू शकता.

उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीतील अटींची जुळते का हे अर्ज किंवा मुलाखतीपूर्वी तपासून घ्यायची आहे. पदासाठी आवश्यक असलेली पदवी, प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी ज्या पदासाठी उमेदवार अर्ज करणार आहेत त्यासाठी फक्त पदवी असणे पुरेसे नाही आहे त्यामुळे असं गृहीत न धरता उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व पात्रता अटी वाचून घ्यायचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे कमाल वय हे 35 वर्षे असे दिले आहे. वयाची गणना कोणत्या तारखेच्या आधारे केली जाणार आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादित सवलत लागू आहे का यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचायची आहे.

वेतन

पर्यटन निरीक्षण पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला अंदाजे 300000/- हजार रुपये ते 35000/-हजार रुपये वेतन मिळणार असल्याचे उपलब्ध भरतीच्या माहितीमध्ये नमूद केले गेले आहे.

उमेदवारांनी वेतन सोबतच नोकरीच्या इतर अटी, जबाबदाऱ्या आणि नियुक्ती संबंधी नियम अधिकृत जाहिरातीमध्ये तपासून घ्यायचे आहे.

निवड प्रक्रिया

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरतीमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे असे अपेक्षित आहे.

मुलाखतीला जाताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, ओळखपत्र, वयाचा पुरावा आणि अनुभवाचे कागदपत्र सोबत ठेवायचे आहे आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्र सोबत ठेवायचे आहे.

मुलाखतीपूर्वी उमेदवारांनी सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहे आणि तपासून घ्यायचे आहे.

मुलाखतीची तारीख

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी पर्यटन निरीक्षण पदासाठी मुलाखतीची तारीख ही 22 सप्टेंबर 2026 आणि 23 सप्टेंबर 2026 असे दिले गेले आहे.

उमेदवारांनी आपल्या मुलाखतीची तारीख, वेळ आणि उपस्थित राहण्यासंबंधी इतर सूचना अधिकृत जाहिरातीतून तपासायचे आहेत. मुलाखतीसाठी शक्यतो वेळेवर संबंधित ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता : आयआरसीटीसी (IRCTC), उत्तर विभाग
बी-148, 11 वा मजला, स्टेट्समन हाऊस,
बाराखंबा रोड, कनॉट प्लेस,
नवी दिल्ली – 110001

उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी वरती दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत भरती जाहिरात डाऊनलोड करून त्यामधील पात्रता आणि कागदपत्रांची यादी वाचावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या प्रती आणि मूळ कागदपत्रे तयार ठेवावीत. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित वेळेत उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीला जाताना कोणते फॉर्म, अर्ज किंवा कागदपत्रे सादर करायची आहेत याची माहिती अधिकृत जाहिराती तपासावी. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवाराच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या क्षणी तयारी करण्याऐवजी मुलाखतीपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवायचे आहेत.

शुद्धिपत्रकशुद्धिपत्रक लिंक
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक 1
पीडीएफ जाहिरात लिंक 2
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment