खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई मध्ये भरतीसाठी जागा निघाल्या आहेत!! KVIC Mumbai Bharti 2026

KVIC Mumbai Bharti 2026 : खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये यंग प्रोफेशनल, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदांचा समावेश आहे. संबंधित पदांसाठी पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे.

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीतील दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज तयार करून आवश्यक कागदपत्रांसोबत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2026 असे आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर दिलेल्या तारखेचे आत उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचे आहे.

ज्या उमेदवारांना या संबंधित क्षेत्रात शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव किंवा प्रशासकीय अनुभव आहे त्यांच्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक तपासून घ्यायचे आहे.

पदांची माहिती

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई या भरतीमध्ये तीन प्रकारच्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार पदांची नावे आणि पदसंख्या खालील प्रमाणे दिले आहे.

यंग प्रोफेशनल – 30 जागा

सल्लागार – 15 जागा

वरिष्ठ सल्लागार -15 जागा

वरती दिलेल्या पदांनुसार एकूण संख्या 60 जागा आहेत. मात्र भरतीच्या प्राथमिक माहितीत एकूण 50 जागा नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेल्या पदनिहाय आणि एकूण पदसंख्या तपासणे आवश्यक आहे. अंतिम आणि अधिकृत माहिती संबंधित विभागाच्या जाहिरातीनुसारच माहिती ग्राह्य धरावी.

शैक्षणिक पात्रता

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई मध्ये भरती होण्यासाठी प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी दिली आहे. त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार खाली पदानुसार शैक्षणिक पात्रता वाचून घ्यायची आहे.

यंग प्रोफेशनल : उमेदवार हा संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मास्टर डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सल्लागार : शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रांमध्ये उपक्रमातून सेवानिवृत्त अथवा स्वैच्छिक सेवानिवृत्त व्यक्ती आणि संबंधित क्षेत्रामध्ये किमान 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ सल्लागार : संबंधित क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मास्टर डिग्री आणि किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी केवळ पदवी असल्यामुळे अर्ज करायचे नाही आहे. संबंधित पदासाठी अनुभव, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी पूर्ण आहेत का हे तपासून घ्यायचे आहे त्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून घेणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा हे 65 वर्ष असे आहे. मात्र विविध पदांसाठी वयोमर्यादा, वय मोजण्याची तारीख किंवा इतर सवलती बाबत स्वतंत्र नियम असू शकतात त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पीडीएफ जाहिरात मध्ये वयोमर्याद्याची अट तपासून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे पदांसाठी अर्ज करायचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असे दिले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित विभागाच्या आवश्यकतेनुसार कामकाजी जबाबदारी देण्यात येऊ शकते.

नोकरीचे ठिकाण, नियुक्तीच्या अटी आणि कामाचे स्वरूप याबाबत अधिक माहिती अधिकृत जाहिरात मध्ये दिलेली असू शकते.

अर्ज करण्याची पद्धत

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.

उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती समजून घ्यायची आहे.

अर्ज भरताना उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरायचे आहेत. चुकीची माहिती व अपूर्ण माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज बाद होऊ शकतो.

आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पोस्टद्वारे पाठवून द्यायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,
19/21, मनोहरदास पथ,
भाटीया बालरक्षक विद्यालय,
फोर्ट, मुंबई – 400 001.

अर्ज पाठवताना लिफाफेवर पदाचे नाव किंवा जाहिरातीतील सांगितलेली इतर माहिती नमूद करणे आवश्यक नाही आहे यासाठी अधिकृत जाहिरातीत तपासावे.

महत्त्वाच्या तारखा

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2026 असे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्जाची प्रक्रिया अंतिम तारखेपूर्वी पूर्ण करायची आहे.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज असल्यामुळे अर्ज पोस्टाने किंवा जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने संबंधित पत्त्यावर पोहोचवायचे आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्ज पाठवण्यापेक्षा उमेदवारांनी काही दिवसा अगोदरच अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना

  • सर्वप्रथम अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे.
  • आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
  • आवश्यक अनुभवाची अट पूर्ण होते का ते तपासून घ्यायचे आहे.
  • वयोमर्यादा आणि वय मोजण्याची तारीख तपासायची आहे.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरायची आहे.
  • आवश्यक प्रमाणपत्रांचे प्रत अर्जासोबत जोडायचे आहे.
  • अर्जावर स्वाक्षरी करणे आवश्यक असल्यास ती करावी.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारीख च्या अगोदर पाठवून द्यायचे आहे.
  • अर्जाची प्रत आणि जोडलेल्या कागदपत्रांची एक प्रत स्वतः सोबत ठेवायची आहे.
  • भरतीची संबंधित अजून संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत माहिती तपासून घ्यायची आहे.
पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment