RRB NTPC Bharti 2026 : रेल्वे विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी एनटीपीसी (NTPC) अंतर्गत ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट स्तरावरील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती मध्ये एकूण 5165 रिक्त पदे भरले जाणार आहेत.
यामध्ये ग्रॅज्युएट लेवलचे 3477 पदे आणि अंडरग्रॅज्युएट लेवलचे 1688 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवारांसाठी रेल्वे विभागात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासून घ्यायचे आहे.
पदांची माहिती
ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी खाली दिलेल्या पदांचा समावेश आहे. ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी एकूण 3447 पदे रिक्त आहेत.
- स्टेशन मास्टर
- गुड्स ट्रेन मॅनेजर
- ट्रॅफिक असिस्टंट
- चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट
- सिनियर क्लर्क कम टायपिस्ट
अंडरग्रॅज्युएट लेवल पदांसाठी खालील या पदांचा समावेश आहे आणि त्यामध्ये एकूण 1688 पदे रिक्त आहेत.
- जुनिअर क्लर्क कम टायपिस्ट
- अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट
- ट्रेन्स क्लर्क
- कमर्शियल कम टिकीट क्लर्क
शैक्षणिक पात्रता
रेल्वे विभाग एनटीपीसी (NTPC) मध्ये भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. अंडरग्रॅज्युएट लेवलच्या पदांसाठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी टायपिंगचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
ग्रॅज्युएट लेवलच्या पदांसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी टायपिंग कौशल्य असणे आवश्यक आहे.
त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता आणि अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे.
वयोमर्यादा
रेल्वे विभाग एनटीपीसी (NTPC) या भरतीसाठी वयोमर्यादा पदाच्या स्तरानुसार निश्चित करण्यात आले आहे. खालील प्रमाणे उमेदवारांनी वयोमर्यादा पदानुसार तपासून घ्यायचे आहे.
ग्रॅज्युएट लेवल पदांसाठी वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 36 वर्ष याप्रमाणे आहे.
अंडरग्रॅज्युएट लेवल पदांसाठी वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 33 वर्ष याप्रमाणे आहे.
आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिले जाणार. ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्ष तसेच एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाणार आहे. इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार सूट वयोमर्यादा साठी लागू होणार त्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे आणि वयोमर्यादाची माहिती पाहून घ्यायची आहे.
महत्त्वाच्या तारखा
या भरतीसाठी ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट लेवल या पदांसाठी अर्ज प्रक्रिया वेगवेगळ्या तारखांना सुरू होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या पदानुसार अर्ज करायचे आहे.
ग्रॅज्युएट लेव्हल (CEN 06/2026)
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज 08 ऑक्टोबर 2026 सुरू होणार आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 06 नोव्हेंबर 2026 असे आहे.
अंडरग्रॅज्युएट लेव्हल (CEN 07/2026)
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज 15 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 नोव्हेंबर 2026 असे आहे.
उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांचे स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी घ्यायची आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगळे आहे. सामान्य, ईडब्ल्यूएस, आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 500/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे आणि एससी/एसटी, इएसएम, ईबीसी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी 250/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज शुल्क संबंधित माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत माहिती तपासून घ्यायची आहे.
वेतन
या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेतनश्रेणी ही वेगवेगळी आहे. दिलेल्या माहितीनुसार काही प्रमुख पदांचे सुरुवातीचे वेतन पुढीलप्रमाणे खाली दिले गेले आहे.
- स्टेशन मास्टर – 35,400/-रुपये प्रति महिना
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 29,200/-रुपये प्रति महिना
- चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर – 35,400/-रुपये प्रति महिना
- जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट – 29,200/-रुपये प्रति महिना
- सीनियर क्लर्क कम टायपिस्ट – 29,200/-रुपये प्रति महिना
याशिवाय रेल्वे विभागाच्या नियमानुसार भत्ते लागू होणार आणि इतर सेवा संबंधित लाभ मिळू शकतात.
निवड प्रक्रिया
रेल्वे विभाग एनटीपीसी (NTPC) या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही विविध टप्प्यांमध्ये होणार आहे. उमेदवाराची निवड संबंधित पदाची आवश्यकतेनुसार केली जाणार आहे.
- संगणक आधारित परीक्षा
- पदानुसार आवश्यक असल्यास स्कील आणि टायपिंग टेस्ट
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
टायपिंग संबंधित पदांसाठी उमेदवारांची टायपिंग चाचणी घेतली जाऊ शकते. प्रत्येक टप्प्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार.
अर्ज कशा पद्धतीने करायचा ?
- रेल्वे विभाग एनटीपीसी (NTPC) या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली ऑनलाइन अर्ज लिंक दिली आहे.
- ग्रॅज्युएट लेवल या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 06 नोव्हेंबर 2026 असे आहे.
- अंडरग्रॅज्युएट लेवल या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 नोव्हेंबर 2026 असे आहे.
- दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.
- उमेदवारांनी याची खात्री करायची आहे की अंतिम तारखेच्या नंतर कोणतेही प्रकारचे उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरताना अचूक भरायचा आहे चुकीचा अर्ज असल्यास अर्ज बाद करण्यात येणार.
- स्वाक्षरी, डॉक्युमेंट आणि फोटो उमेदवारांनी तपासून अपलोड करायचे आहे.
- ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्याकडे एक प्रत ठेवायची आहे जे भविष्यामध्ये काम येऊ शकते या भरतीसाठी.
- संपूर्ण माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत वाचून घ्यायचे आहे.
| पीडीएफ जाहिरात | पीडीएफ जाहिरात लिंक |
| ऑनलाइन अर्ज | ऑनलाईन अर्ज लिंक |
| अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट लिंक |