केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये स्पोर्ट्स कोटा मध्ये 521 रिक्त जागा!! CRPF Sports Quota Bharti 2026

CRPF Sports Quota Bharti 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत स्पोर्ट्स कोटा मधून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसारित करण्यात आली आहे. या भरती मध्ये हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदांचा समावेश आहे. एकूण 521 जागा रिक्त आहेत.

क्रीडा क्षेत्रामध्ये कामगिरी केलेल्या आणि संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची ठरणार आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करायची आहे आणि उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही 12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 नोव्हेंबर 2026 असे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिलेलं तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवून द्यायचे आहे आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपली पात्रता, क्रीडा पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी बघून घ्यायचे आहे.

पदांची माहिती

केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत दोन प्रमुख पदांसाठी ही भरती राबविण्यात आली आहे.

हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी एकूण 182 जागा रिक्त आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 150 आणि महिला उमेदवारांसाठी 32 जागा रिक्त आहेत.

कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी एकूण 329 जागा रिक्त आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 258 आणि महिला उमेदवारांसाठी 81 जागा रिक्त आहेत.

अशाप्रकारे दोन्ही पदांची एकूण पदसंख्या ही 521 इतकी आहे.

खेळनिहाय रिक्त पदे

या भरतीमध्ये विविध क्रीडा प्रकारांच्या समावेश करण्यात आला आहे त्यामुळे खाली दिलेल्या टेबल मध्ये खेळानुसार किती पदांचा समावेश आहे आणि जागा रिक्त आहे त्याची माहिती व पद संख्या दिली आहे.

क्रीडा प्रकारपदांची संख्या
जलतरण क्रीडा60
धनुर्विद्या03
बॅडमिंटन05
बास्केटबॉल16
शरीरसौष्ठव11
बॉक्सिंग20
फुटबॉल22
जिम्नॅस्टिक12
हँडबॉल12
हॉकी15
ज्यूडो16
कबड्डी27
कराटे17
नेमबाजी53
तायक्वांदो14
व्हॉलीबॉल20
जल क्रीडा20
वेटलिफ्टिंग19
वुशू20
कुस्ती20
योगासन12
ॲथलेटिक्स101

इच्छुक उमेदवारांनी संबंधित क्रीडा प्रकारासाठी आवश्यक असलेली क्रीडा पात्रता आणि प्रमाणपत्रांची अट अधिकृत जाहिरातीमध्ये तपासून घ्यायचे आहे आणि त्यानुसार अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे.

हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी संबंधित संपक्ष सैन्य पात्रता लागू होऊ शकते.

कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

संबंधित पदासाठी शैक्षणिक पात्रता सोबत या भरतीसाठी संबंधित क्रीडा पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. कोणत्या स्पर्धा, स्तर किंवा क्रीडा प्रमाणपत्र मानले जाईल, याची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासून घ्यायचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 वर्ष ते 23 वर्ष च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाणार आहे. एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षांची वयामध्ये सूट दिली आहे आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षाची वयोमर्यादा मध्ये सूट आहे.

वयाची गणना कोणत्या तारखेच्या आधारे केली जाणार आहे याचे कडे अर्ज करताना विशेष लक्ष द्यायचे आहे याची उमेदवारांनी खात्री ठेवायची आहे.

वेतनश्रेणी

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे.

हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी लेवल-4 वेतनश्रेणी असून वेतन 25,500/-रुपये ते 81,100/-रुपये प्रति महिना असणार आहे.

कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदासाठी लेवल-3 वेतनश्रेणी असून वेतन 21,700/-रुपये ते 69,100/-रुपये प्रति महिना असणार आहे.

केंद्र सरकारी सेवेमधील नियमानुसार सर्व भत्ते निवड झालेल्या उमेदवारांना लागू होणार आणि इतर सुविधाही मिळणार. प्रत्यक्ष वेतन व भत्त्यांबाबतची माहिती नियुक्तीच्या नियमानुसार ठरणार.

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही विविध टप्प्यांमध्ये होणार आहे. उमेदवारांची कागदपत्रे आणि ओळखपत्र तपासल्यानंतर शारीरिक तसेच क्रीडा संबंधित चाचण्या घेतल्या जाणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्प्यांचा समावेश आहे.

  • ओळखपत्र तपासणी.
  • प्रमाणपत्रे व कागदपत्रांची तपासणी
  • शारीरिक मानक चाचणी
  • क्रीडा चाचणी
  • सविस्तर वैद्यकीय तपासणी
  • पुनर्वैद्यकीय तपासणी, लागू असल्यास

उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्याची प्रति तयार करून ठेवणे आवश्यक आहे. क्रीडा प्रमाणपत्र मध्ये किंवा शैक्षणिक कागदपत्रांमध्ये कोणतेही विसंगती आढळून आल्यावर उमेदवाराचे अर्जावर परिणाम होऊ शकतो.

अर्ज शुल्क

केंद्रीय पोलीस दल क्रीडा कोटा या भरतीसाठी काही उमेदवारांना अर्ज शुल्क लागू आहे.

सामान्य/ओबीसी/ईडब्लूएस या प्रवर्गाच्या उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क आहे.

एससी/एसटी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारले गेले नाही आहे.

अर्ज शुल्क भरताना उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

महत्त्वाच्या तारखा

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 नोव्हेंबर 2026 असे आहे. अर्जामध्ये दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी 12 नोव्हेंबर 2026 ही तारीख दिली आहे. उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पूर्ण भरून सबमिट करून द्यायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

केंद्रीय पोलीस दल क्रीडा कोटा या भरतीमध्ये केवळ शैक्षणिक पात्रता पुरेसे नसून त्यासोबतच संबंधित क्रीडा पात्रता आणि अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या इतर अटी पूर्ण करणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचावी.

क्रीडा प्रमाणपत्र,शैक्षणिक प्रमाणपत्र,ओळखपत्र जन्मतारखेचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवायचे आहे. अर्ज मध्ये चुकीची माहिती भरल्यास किंवा आवश्यक पात्रता पूर्ण होत नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो याची उमेदवारांनी खात्री ठेवायची आहे.

ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि सुरक्षा संस्था असल्यामुळे भरती प्रक्रियेत दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. भरणी बाबत पुढील प्रक्रिया, चाचणीचे वेळापत्रक, प्रवेश पत्र आणि इतर सूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्ज (12 ऑक्टोबर 2026 पासून सुरू)ऑनलाईन अर्ज लिंक
अधिकृत जाहिरातअधिकृत जाहिरात लिंक

Leave a Comment