Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत पर्यटन याच्यासोबत संबंधित विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये पर्यटन गेट व्यवस्थापक आणि पर्यटन गेट सहाय्यक या पदांचा समावेश केला आहे. या दोन्ही पदांसाठी एकूण रिक्त पदे हे 32 असे उपलब्ध केले आहेत.

या पदांसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असलेला पाहिजे आणि संबंधित पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. वन विभागात पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार याचे जाहिरातीत नमूद केले आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता तपासून घ्यायची आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने तसेच ई-मेलद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करून द्यायचे आहे.

पदांची माहिती आणि रिक्त जागा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर या भरतीमध्ये एकूण 32 पदे उपलब्ध आहेत. त्या 32 पदांसाठी त्यामध्ये दोन पदांसाठी समान संख्येने जागा देण्यात आले आहेत. पदांचे नाव हे पर्यटन गेट व्यवस्थापक आणि पर्यटन गेट सहाय्यक याप्रमाणे आहे.

  • पर्यटन गेट व्यवस्थापक – 16
  • पर्यटन गेट सहाय्यक – 16

या दोन्ही पदांची संख्या ही 32 असे आहे.

शैक्षणिक पात्रता

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त 10वी उत्तीर्ण असणे या भरतीसाठी पुरेसे नसून इतर अटी उमेदवारांसाठी लागू असू शकतात त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात तपासून घ्यायचे आहे.

तसेच वन विभागांमध्ये पूर्वी काम केलेल्या उमेदवारांना व वन विभागात संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे अनुभव असलेल्या उमेदवारांनी अर्जामध्ये आपल्या अनुभवाची योग्य माहिती नमूद करायची आहे.

वयोमर्यादा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा संबंधित इतर अटी बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात तपासायची आहे व प्रवर्गानुसार वयोमर्यादा ची माहिती पाहून घ्यायची आहे. इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाणार.

वेतन

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन देण्यात येणार.

पर्यटन गेट व्यवस्थापक : प्रति महिना 16,000/-रुपये मानधन + 2,000/-रुपये अतिरिक्त पत्ता दिले जाणार आहे.

पर्यटन गेट सहाय्यक : प्रति महिना 15,000/-रुपये मानधन दिले जाणार आहे.

मानधन संबंधित अधिक माहिती आणि अटी लागू असलेल्या माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे चंद्रपूर येथे राहणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र मध्ये महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे त्यामुळे तिथे पर्यटन व्यवस्था संबंधित कामासाठी या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करता येणार आहे.

ऑफलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित कार्यालयाच्या पत्त्यावर पोहोचवायचे आहे. ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये सांगितलेल्या पद्धतीने नुसार अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ई-मेलवर पाठवायचे आहे.

अर्ज पाठवताना उमेदवारांनी आपले नाव, संपर्क क्रमांक, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरायची आहे याची खात्री उमेदवारांनी करायची आहे. चुकीची माहिती भरल्यास उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येणार त्यामुळे उमेदवारांनी माहिती भरून झाल्यावर एकदा तपासून घ्यायचे आहे आणि मग अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचा आहे.

उपसंचालक (बफर),
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर,
रामबाग फॉरेस्ट कॉलनी कॉम्प्लेक्स,
मूल रोड, चंद्रपूर – 442 401,
महाराष्ट्र.

ई-मेलद्वारे अर्ज

उमेदवार ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे अर्ज देखील करू शकता.

ई-मेल : RecruitmentDDBuffer@gmail.com

ऑनलाइन पद्धतीने ईमेलद्वारे अर्ज पाठवताना विषयांमध्ये संबंधित पदाचे नाव स्पष्टपणे नमूद करायचे आहे. आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार उमेदवारांनी ई-मेल मध्ये जोडायचे आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 सप्टेंबर 2026 असे दिले आहे.

अर्ज 28 सप्टेंबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेपर्यंत वाट न पाहता उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करायचा आहे. ज्यामुळे तांत्रिक किंवा टपालाशी संबंधित अडचण असल्यास ती दूर करण्यासाठी वेळ मिळू शकतो. अंतिम तारखे नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची खात्री उमेदवारांनी करायची आहे.

महत्त्वाच्या सूचना

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात तपासून द्यायचे आहे आणि आपले शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव आणि आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत या संबंधित सर्व अटी तपासून घ्यायचे आहेत.

अर्ज मध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असल्यास उमेदवारीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे अर्ज करताना सर्व माहिती एकदा तपासून घ्यायची आहे.

वन विभागातील पूर्व अनुभव असलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे त्यासाठी उमेदवारांनी आपले अनुभवाचे प्रमाणपत्र किंवा संबंधित कागदपत्रे असल्यास ती जाहिरात ती नमूद केलेल्या पद्धतीनुसार सादर करायची आहे.

पीडीएफ जाहिरातपीडीएफ जाहिरात लिंक
अधिकृत वेबसाईटअधिकृत वेबसाईट लिंक

Leave a Comment